Friday, March 28, 2008

वेगे धाव...

वेगे धाव
धाव वेगे
पाहू नको मागे
मागे ना सोयरे
ना कुणी सगे
वेगे धाव...

शून्यातून येशी
शून्यातच जाशी
तुझ्यासवे
जाते सारे
मागे नुरतात धागे
वेगे धाव
धाव वेगे
पाहू नको मागे...
(काव्यांश)

1 comment:

Vaishali Hinge said...

खरय...!!! छाने कविता..