Thursday, March 27, 2008

साहस

कसे तुला ना कळले
नाही मलाही कळले?
कधी केतकी बनात
पाय चुकून वळले!
अशा केतकी बनात
देऊ नये हाती हात
जरी मादकसा गंध
भिजू नये चांदण्यात
असे चांदणे विकारी
जाऊ नये त्या आहारी
असे किंमत जीवन
त्याची जगाच्या बाजारी
कधी करता येईल
आपल्याला हे साहस?
आणि तोडता येईल
जन्मदात्यांचा विश्‍वास?
नाही तुला जमणार
नाही मला जमणार
धीर होईतोपावेतो
चांदणेच संपणार!

No comments: