फुलापासून दुर्मिळ
जाताना थोडे दूर
का भरून आला?
आला माझा ऊर...
पाकळ्यांतील केसरांनी
झेलले रक्तकण माझे
लाल-गुलाबी ते गंधाचे
फुलावर सुंदर ओझे
ऐन ग्रीष्मात का आला
डोळ्यांना माझ्या पूर
का भरून आला?
आला माझा ऊर...
Friday, March 7, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)



No comments:
Post a Comment