Thursday, March 27, 2008

झाड आणि पाखरू (३)

पाखरा पाखरा
कुणासाठी
घरटे इवले
बांधतोस रे?
पिले तुझी
शहाणी होताच
उडून सारी
जातील रे!

2 comments:

shrikrishna said...

म्हणून घरटं बांधू नको कां?
माझ्या सखी बरोबर
प्रणय करूं नको का?
मग निर्मीती कशी होईल?
ईवले ईवले दाणं आणून
चीव चीव करणऱ्या माझ्या
पिल्लाना भरवताना मजेचं काय?
गेली उडून तर जावूदे उडून
कुठे तरी घरटं बांधून राहू देत
त्यांच्या सख्यासंग प्रणय करूं देत
अशीच निर्मीती करू देत
असतील तिथं सुखी राहू देत

श्रीकृष्ण सामंत

mahendra phate said...

प्रतिक्रिया आवडली. तीच अपेक्षित होती. धन्यवाद!