Tuesday, July 15, 2008

पाऊस (६)

बेभान

पावसाने

केले

मला

ओलेचिंब...

जलही

थरथरले

कसे पाहू?

प्रतिबिंब!

Saturday, July 12, 2008

पाऊस (५)

किती तरी
यज्ञ केले
पाऊस काही
आला नाही...
आता
हे धगधगते
यज्ञकुंड
विझवायचे
तरी कसे?

Sunday, July 6, 2008

सत्कार!

दमलो!...
झाले फार
वाटते आता
व्हावे ठार...
स्वतःच्या
हाताने
स्वतःच्याच
गळ्यात
घालून घ्यावा
पुष्पहार...
करावा
स्वतःच स्वतःचा
अंतिम
जंगी सत्कार!

Friday, July 4, 2008

पाऊस (४)

दिवस आले

गरजत

पावसाचे

सृष्टीने केले

स्वागत

पावसाचे

तू मात्र

बसलास

घरात एकटाच

लिहीत ते गीत

पावसाचे

माझ्या नयनी

अश्रू...

की ओघळती

थेंब ते

पावसाचे?

Sunday, June 22, 2008

पाऊस (3)

पाऊस
कधी
स्वतः
येत असतो का?
ती
हिरवी पालवीच
त्याला
आमंत्रण
देत नसते का?

Friday, June 13, 2008

पाऊस (२)

पाऊस म्हणून
येणार होता
आला
होऊन वादळ
त्याने
उद्‌ध्वस्त केले...
आतापर्यंत जपलेले
डोळ्यातले काजळ

Wednesday, June 11, 2008

पाऊस (१)

पाऊस

कितीही

मोहविणारा असला

तरी

भीती वाटते

भिजायला...

तो नेहमीच

आवडतो

मला

काचेआडून पाहायला!